वाचा:
मालाडमधील गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. एक दुमजली घर अचानक नजीकच्या दुमजली इमारतीवर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत पाच जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी या पाचही जणांना प्रथम सुखरूपपणे बाहेर काढले व त्यानंतर युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले.
वाचा:
दुर्घटना घडली तिथे जवळच एक तळ अधिक तीन मजल्यांची धोकादायक स्थितीतील इमारत असून त्यात काही कुटुंबांचे वास्तव्य आहे. खबरदारी म्हणून ही पूर्ण इमारत रिकामी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या इमारतीतील रहिवाशांना अन्यत्र हलवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आले. मुंबई महापालिकेचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही सर्व बांधकामे कलेक्टर लँडवर असल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मुंबईत बुधवारी मान्सूनचे आगमन झाले. मान्सूनने पहिल्याच दिवशी जोरदार सलामी दिली. पावसाच्या तडाख्यात मुंबईतील अनेक भाग जलमय झाले होते. उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. त्यातूनच ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times