मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते यांचा पुतण्या याने आरोग्य कर्मचारी असल्याचे दाखवून घेतली होती, असे आता समोर आहे. याबाबत माहिती अधिकाराखाली अर्ज करण्यात आला होता. त्याला मिळालेल्या उत्तरातून तन्मयच्या लसीकरणाची वस्तुस्थिती पुढे आली आहे. दरम्यान, तन्मय हा आरोग्य कर्मचारी असल्याची नोंद कुठेही आढळत नाही. ( )

वाचा:

देशात १ मे पासून १८ ते ४४ या वयोगटाचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्याआधी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स तसेच ६० वर्षांवरील नागरिक आणि ४५ ते ६० या वयोगटातील सहव्याधीग्रस्त नागरिक यांच्या लसीकरणास परवानगी देण्यात आली होती. असे असताना तन्मय फडणवीस याने १ मेच्या आधीच दोन्ही डोस घेतल्याचे स्पष्ट झाले होते. तन्मय याने पहिला डोस मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात तर दुसरा डोस नागपूर येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट येथे घेतला होता. २० एप्रिल रोजी एक फोटो व्हायरल झाल्याने ही बाब पुढे आली होती. त्यावरून मग बरंच वादळ उठलं होतं. आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यावर तीव्र आक्षेप घेत चौकशीची मागणी केली होती. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी तन्मय हा दूरचा नातेवाईक असल्याचे सांगत त्याने लस नेमकी कशी घेतली हे आपणास माहीत नसल्याचे सांगितले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आता अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

वाचा:

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी तन्मय अभिजीत फडणवीसच्या लसीकरणाबाबत माहिती अधिकारात माहिती मागितली होती. तन्मय ४५ वर्षांवरील नसल्याने त्यांना कोणत्या आधारावर लस देण्यात आली हे स्पष्ट व्हावे, अशी मागणी यादव यांनी आपल्या अर्जात केली होती. त्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता यांच्या कार्यालयाने उत्तर दिले असून तन्मय यांनी आरोग्य कर्मचारी असल्याचे दाखवून लस घेतल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, तन्मय याने सोशल माध्यमांत आपली ओळख अभिनेता अशी दिली आहे. असे असताना त्याने आरोग्य कर्मचारी म्हणून लस घेतल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here