केंद्रीय आरोग्य मंत्रालयाअंतर्गत डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्स सर्विसने (DGHS)या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एसिम्पटोमॅटिक आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी स्टेरॉइडचा वापर हा घातक असल्याचं म्हटलं आहे. १८ वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांवर रेमडेसिवीरच्या वापरावर पुरेशी सुरक्षा आणि प्रभावी आकड्यांचा अभाव आहे. यामुळे त्यांचा उपयोग करण्यापासून वाचलं पाहिजे, असं सूचनेत म्हटलं आहे.
लहान मुलांसाठी ६ मिनिटांच्या वॉक टेस्टची सूचना करण्यात आली आहे. १२ वर्षांहून अधिक वयाच्या मुलांची पालकांच्या देखरेखीखाली ६ मिनिटांची वॉक टेस्ट करावी. वॉक टेस्टमध्ये मुलाच्या बोटांना ऑक्सिमीटर लावून त्याला सलग ६ मिनिटं चालण्यास सांगावं. यानंतर ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल आणि पल्स रेट मोजावी. यामुळे हायपोक्सियाचे निदान होईल, असं मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे.
हॉस्पिटलमध्ये दाखल गंभीर आणि अत्यंत गंभीर रुग्णांच्या उपचारात अतिशय बारकाईने देखरेख ठेवत स्टेरॉइड औषधाचा उपयोग करण्याची सूचना देण्यात आली आहे. ही सूचना फक्त गंभीर आणि अत्यंत गंभीर रुग्णांसाठीच आहे. स्टेरॉइडचा उपयोग हा योग्य वेळी केला पाहिजे. त्याचे योग्य प्रमाणात डोस दिले गेले पाहिजे. रुग्णांना स्वतःला स्टेरॉइडच्या वापरापासून दूर ठेवले पाहिजे.
DGHS च्या इतर प्रमुख सूचना
> मुलांनी कायम मास्क घालावा, हात स्वच्छ धुवावेत आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं
> मुलांना कायम पौष्टीक आहार द्यावा. यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती उत्तम राहील
> सौम्य लक्षणं दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पॅरासिटामोल (10-15 MG)देता येऊ शकते
> घसात खवखव किंवा खोकला आल्यावर मोठ्या मुलांना गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात
> सौम्य लक्षण असल्यास तात्काळ ऑक्सिजन थेरेपी सुरू करावी
मुलांना गंभीर संसर्गाचा धोका नाही
देशात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. करोना रुग्णांची संख्या देशात सतत कमी होत आहे. पण तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर गंभीर परिणाम होऊ शकतो असं बोललं जातंय. यावर एम्सचे संचाल डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मंगळवारी माहिती दिली. लहाना मुलांना करोनाच्या लाटेचा गंभीर धोका असल्याचा डाटा जगात कुठेही उपलब्ध नाही आणि पुरावेही नाहीत, असं डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times