मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पक्षाला यंदा २२ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री यांनी यानिमित्तानं वृत्तवाहिन्यांशी बोलताना पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला आहे. तसंच, एका गोष्टीबद्दल खंतही व्यक्त केली आहे. ( on )

सोनिया गांधी यांच्या विदेशी वंशाच्या मुद्द्यावर यांनी १९९९ साली काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्यांच्या या धाडसी निर्णयात अनेक नेत्यांनी त्यांना साथ दिली. पक्ष स्थापनेनंतरची पहिली निवडणूक स्वतंत्र लढल्यानंतर दोन्ही पक्ष सत्तेसाठी पुन्हा एकत्र आले. २००४ सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं काँग्रेसपेक्षाही अधिक जागा पटकावल्या. त्यावेळी सत्तावाटपाच्या फॉर्मुल्यानुसार मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आले होते. मात्र, काही कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेसनं हे पद काँग्रेसला दिले होते. त्या निर्णयाबद्दल पक्षातील नेत्यांची मते आजही वेगवेगळी आहेत. जयंत पाटील यांनी २२ वर्षांच्या वाटचालीबद्दल बोलताना या निर्णयावर आपलं मत मांडलं आहे.

‘राजकीय परिस्थिती जशी असेल तशी तडजोड त्या-त्या वेळी केली जाते. त्यावेळी मुख्यमंत्रिपद आम्हाला मिळायला पाहिजे होतं हे खरं आहे. पण तेव्हा वरिष्ठ नेत्यांमध्ये काही चर्चा झाली होती. त्यानुसार हे पद काँग्रेसला दिलं गेलं. आता त्यावर वेगळं भाष्य करणं योग्य नाही. त्यावेळी आम्ही मुख्यमंत्रिपद घेतलं असतं तर आताची परिस्थिती वेगळी असती. राजकारणात वेगळे बदल दिसले असते,’ असं जयंत पाटील म्हणाले. ‘काँग्रेसी विचारांचं सरकार महाराष्ट्रात राहावं अशी शरद पवार साहेबांची भूमिका नेहमीच होती. त्या भूमिकेतून त्यांनी समजुतीची भूमिका घेतली होती. आजही काँग्रेसच्या तुलनेत आमचा पक्ष मोठा आहे. मोठ्या भावाच्या नात्यानं काँग्रेसला सोबत घेऊन, शिवसेनेला सोबत घेऊन पवारसाहेबांनी राज्यात जे सरकार स्थापन केलंय. ते जास्त काळ चालावं हीच आमची भूमिका आहे,’ असं पाटील यांनी स्पष्ट केलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here