पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनमध्ये उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या स्वयंपूर्ण वैद्यकीय ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण जावडेकर यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले. त्यावेळी ते बोलत होते. जावडेकर म्हणाले, ‘करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनसंबंधी अनेक त्रुटी आढळून आल्या. अनेक रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प नाहीत. ऑक्सिजनची उपलब्धता करणे हे मोठे आव्हान बनले. तरीही सरकारने संकटाच्या काळातही एक हजार टन ऑक्सिजन उपलब्ध केला. आता पीएम केअर फंडातूनही ऑक्सिजन प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला आला आहे. भविष्यात हॉस्पिटलमध्ये असलेल्या बेडच्या संख्येच्या प्रमाणात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा नियम सरकार करेल.’
इंदोरीकर महाराज म्हणाले, काळाची गरज ओळखून विखे पाटील परिवार समाजासाठी काम करत असतो. सेवेची अनुवंशिकता ही त्यांच्या सर्व पिढ्यांमध्ये पाहायला मिळते. करोनाच्या संकटात या परिवाराने जिल्ह्यासाठी खूप काम केले. या संकटाला घाबरून चालणार नाही. आत्मविश्वासानेच सामोरे जावे लागेल. या आत्मविश्वासातच आत्मिक समाधान आहे.’
वाचा:
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘हा ऑक्सिजन प्रकल्प हा सेवेचाच एक भाग असून, पंतप्रधान मोदी यांनी मोठ्या धैर्याने या संकटातून देशाला सावरले. लसीकरणाच्या माध्यमातून देश पुन्हा आत्मविश्वासाने उभा राहत आहे.’
समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. विखे पाटील फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, विश्वस्त डॉ. सुप्रियाताई ढोकणे-विखे पाटील, ॲड. वसंतराव कापरे, उपसंचालक डॉ. अभिजीत दिवटे, तांत्रिक संचालक डॉ. पांडुरंग गायकवाड यांच्यासह फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times