१९८७मध्ये ‘मिस्टर इंडिया ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या सिक्वेलचं नाव ‘मिस्टर इंडिया २’ असं असणार आहे. ‘मोगॅम्बो खुश हुआ..’ हा संवाद अजरामर करून ठेवणारे अभिनेते अमरीश पुरी यांनी मोगॅम्बोची भूमिका साकारली होती. हिच मोगॅम्बोची भूमिका शाहरुख साकारणार आहे तर अनिल कपूर यांची नायकाची भूमिका अभिनेता रणवीर सिंग साकारू शकतो.
सिनेसृष्टीत चर्चा सुरू असली तरी या चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्यापही झालेली नाही. अशी माहिती अली अब्बाज जफर यांनी दिली. ते चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याचीही चर्चा आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शेखर यांनी अनिल कपूर यांची भेट घेतल्यानंतर एक फोटो शेअर केला होता. शेखर कपूर यांनी फोटो शेअर करताना लिहिलंय की, ‘मिस्टर इंडिया २ साठी लुकची चर्चा करताना’…त्यामुळं अनिल कपूर हे पुन्हा मिस्टर इंडिया-२ मध्ये झळकणार असल्याच्या चर्चा होत्या. आता शाहरुख आणि रणवीरचं नाव पुढं आल्यानं प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये संभ्रम होण्याची शक्यता आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times