मुंबई : करोनाच्या जीवघेण्या संकटात पहिल्या लॉकडाऊनवेळी वीज बिल माफी दिल्याच्या आश्वासनाने आव्वाच्या सव्वा आलेली बिलं लोकांनी भरलीच नव्हती. पण लॉकडाऊन उठताच महावितरणाने शक्ती लावून लोकांकडून बिलं वसूल करून घेतली. आता दुसरंही लॉकडाऊन संपलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महावितरणकडून वसुली केली जाणार आहे. अधि माहितीनुसार, उद्यापासून बिलांची वसुली मोहीम राबविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

लॉकडाउनच्या काळात दुकाने, उद्योगधंदे, व्यापार ठप्प असल्यामुळे लोकांवर आर्थिक संकट ओढवलं. अशातच महावितरणने भलीमोठी बिल पाठवून नागरिकांना आणखी आर्थिक संकटात टाकलं. यामुळे सत्ताधाऱ्यांनी वीजबिल माफीची पुडी सोडली आणि लोकांना आव्वाच्या सव्वा बिलं आली. लॉकडाऊन संपताच महावितरणाने शक्कल लढवून लोकांकडून बिलांची वसुली करून घेतली. कधी मीटर बंद तर कधी डीपी बंद करून लोकांकडून बिलं वसूल करण्यात आली.

आता दुसरं लॉकडाऊनही संपलं आहे. त्यामुळे उद्यापासून थकित बिलं वसूल करण्याचे आदेश महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. लॉकडाऊन उठलं असलं तरी नागरिक अजूनही आर्थिक संकटातून सावरले नाहीत. अशात आता महावितरण बिलांसाठी मागे लागल्यामुळे नागरिकांना शॉक बसणार हे नक्की.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here