मुंबई : पोलिस अधिकारी भीमराज घाडगे यांनी केलेल्या एफआयआर प्रकरणात मुंबई व ठाण्याचे माजी पोलिस आयुक्त () यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. कारण १५ जूनपर्यंत परमवीर सिंह यांचं संरक्षण कायम ठेवण्यात आलं असून १५ जूनच्या पुढील सुनावणीपर्यंत अटक कारवाई करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात () दिली आहे.

परमवीर सिंह यांच्यावर पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना परमबीर सिंग यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बिल्डरांच्या एका भ्रष्टाचार प्रकरणातील अनेक आरोपींची नावे वगळण्यासाठी त्यांनी माझ्यावर प्रचंड दबाव आणला. मी त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे त्यांनी कट रचून मला लक्ष्य केले आणि माझ्याविरोधात ५ धादांत खोटे एफआयआर नोंदवायला लावले, असं निदर्शनास आणत घाडगे यांनी भारतीय दंड संहिता व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परमवीर सिंहांना याआधीही मिळाला होता दिलासा
परमवीर सिंह यांना याआधी झालेल्या सुनावणीमध्ये ९ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांना दिलासा मिळाला आहे. १५ जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं असून या सुनावणीनंतर सिंह यांच्याविरोधीत इतर आरोपांच्या तपासालाही वेग येईल, असंही म्हटलं जात आहे.

परमवीर सिंह यांचा राज्य सरकारशी पंगा!
पदावरून हटवण्यात आल्यानंतर परमवीर सिंह यांनी थेट तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातच दंड थोपटले. सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना एक भलंमोठं पत्र लिहित अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार आणि वसुलीचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांची चौकशी सुरू झाल्यानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावं लागलं.

दरम्यान, परमवीर सिंह यांच्यावरही गेल्या काही दिवसांत खंडणीसह अनेक आरोप झाले आहेत. त्यामुळे याप्रकरणी आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here