पेशावर: नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजईने विवाहाबाबत केलेल्या कथित वक्तव्यामुळे पाकिस्तानमधील कट्टरतावादी भडकले आहे. मागील काही दिवसांपासून मलालाविरोधात जोरदार टीका सुरू आहे. काही दिवसापूर्वी आत्मघाती हल्ला करून मलाला युसूफजईला ठार मारण्याची धमकी एका मौलवीने दिली होती. धमकी देणाऱ्या मौलवीला अटक करण्यात आली आहे.

खैबर पख्तूनख्वा प्रांतातील मारवत जिल्ह्यातील मुफ्ती सरदार अली हक्कानी या मौलवीने मलाला युसूफजईला ठार मारण्याची धमकी दिली होती. बुधवारी या मौलवीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दहशतवादविरोधी कायद्यानुसार या मौलवीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वाचा:


वाचा:
या मौलवीचा एक व्हिडिओ पाकिस्तानमध्ये व्हायरल होत आहे. पेशावरमध्ये एका सभेला हा मौलवी संबोधित करत होता. या सभेत मौलवीने मलालाविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये केली असल्याचे आढळून आले असल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. मलाला पाकिस्तानमध्ये आली की तिच्यावर मी पहिला आत्मघाती हल्ला करणार असल्याची धमकी या मौलवीने दिली असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. या मौलवीच्या चिथावणीखोर भाषणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here