अलिकडेच सुनील ग्रोव्हरने एका रेडिओला मुलाखत दिली. यावेळी सुनीलला विचारले की, तो कपिलबद्दल काय विचार करतो आणि त्याच्यासोबत तो काम करणार का? त्यावर सुनीलने उत्तर दिले की, ‘ सध्या तरी कपिलसोबत काम करण्याचा माझा कोणताही विचार नाही. परंतु जर संधी मिळाली तर आम्ही दोघे नक्की एकमेकांबरोबर काम करू…’
सुनीलने आता सिनेमांमध्ये पदार्पण केले आहे. काही दिवसांपूर्वी कपिलच्या वाढदिवशी सुनीलने त्याला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. सुनीलच्या शुभेच्छांवर कपीलने देखील प्रतिक्रिया देत त्याचे आभार मानले होते.
वाद विसरायचा आहे
कपिल आणि सुनील यांच्यामध्ये २०१७ मध्ये वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्यात अनेक दिवस संवाद नव्हता. परंतु आता दोघांनाही हे वाद विसरून जायचे आहेत, तसे त्यांनी जाहीरपणे सांगितले देखील होते.
दरम्यान, गेल्या वर्षी २०२० मध्ये एका कार्यक्रमात कपिलने त्या दोघांमधील वादावर भाष्य केले होते. तो म्हणाला होता, ‘ लहान लहान गोष्टी घडतात परंतु त्यामुळे नाते तुटत नाहीत. सुनील हरहुन्नरी कलाकार आहे, मी वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम करतो आहे, त्यासगळ्यांकडून खूप काही चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत असे मला वाटते. सुनीलकडूनही मी खूप काही गोष्टी शिकलो आहे. जर भविष्यात त्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तर मजा येईल हे नक्की… ‘
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times