पोलिस उपनिरीक्षक सुनिल जगन्नाथ वाणी (वय ५६, रा. भिरुड कॉलनी, भुसावळ) आणि कॉन्स्टेबल गणेश महादेव शेळके (वय ३१, रा. पोलिस वसाहत, वरणगाव) अशी लाच घेताना अटक केलेल्यांची नावे आहेत.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाने त्याच्या डंपरसाठी (एमएच ४० एन ४०८६) वरणगाव पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक वाणी व शेळके यांच्याकडे परवानगी मागितली होती. कारवाई न करण्याच्या बदल्यात दोघांनी तक्रारदार यांच्याकडून १० हजार रुपयांची मागणी केली.
दरम्यान, तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने वरणगाव पोलिस ठाण्यातच सापळा रचला. वाणी व शेळके यांनी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. या दोघांवर वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा रचला सापाळा
पोलिस उपनिरीक्षक वाणी व कर्मचारी शेळके यांनी गुरुवारी सकाळीच तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. पैसे आणण्यासाठी तक्रारदाराने वेळ मागून घेतली होती. यावेळेत त्याने तक्रार केली. लाच स्वीकारण्यासाठी दोघेजण पोलिस ठाण्यात एका खोलीत थांबून होते. त्यामुळे पथकाने पोलिस ठाण्याच्या आवारातच सापळा रचला. बंद खोलीत दोघांनी लाच स्वीकारताच तक्रारदारे याने सहाकाऱ्यास फोन करण्याचा बनाव करत एसीबीच्या पथकातील सदस्याला फोन करताच दबा धरुन बसलेल्या पथकाने धाव घेत लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times