मुंबई: मुंबईत आज पुन्हा एकदा रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळाली. गेल्या २४ तासांत मुंबईत ६६० नवीन बाधित रुग्णांची भर पडली आहे तर त्याचवेळी ७६८ रुग्ण करोनावर मात करून रुग्णालयातून घरी परतले आहेत. आज करोनाने २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा आता १५ हजार १२२ इतका झाला आहे. ( )

वाचा:

महापालिकेच्या अथक प्रयत्नांमुळे करोना संसर्गाचा विळखा सैल झाला आहे. गेले काही दिवस करोनाचा ग्राफ उतरता राहिला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट आता ९५ टक्के इतका असून रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल ५६६ दिवसांवर गेला आहे. मुंबईत आज करोनाच्या २५ हजार ३९६ चाचण्या करण्यात आल्या. मुंबईतील झोपडपट्टी विभाग आणि चाळींमध्ये सध्या २५ सक्रिय आहेत तर पाच पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या ९३ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.

वाचा:

करोनाची आजची स्थिती अशी:

२४ तासांत बाधित रुग्ण – ६६०
२४ तासांत बरे झालेले रुग्ण – ७६८
बरे झालेले एकूण रुग्ण – ६८१२८८
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९५%
एकूण सक्रिय रुग्ण- १५८११
रुग्ण दुप्पटीचा दर- ५६६ दिवस
कोविड वाढीचा दर ( ३ जून ते ९ जून)- ०.१२ %

वाचा:

जिल्ह्यात करोनाबळींची संख्या १० हजाराच्या पार

ठाणे जिल्ह्यात करोनाबळींची संख्या १० हजाराच्या पुढे गेली असून गुरुवारी ६५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी ठाणे शहरात ४, ६, नवी मुंबई ४, भिवंडी १, मिरा-भाईंदर १, अंबरनाथ ४५, ठाणे ग्रामीणमध्ये ४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगर आणि बदलापूरमध्ये गुरुवारी एकाही रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. अशाप्रकारे जिल्ह्यातील मृतांची संख्या वाढत १० हजार ५६ इतकी झाली आहे तर दिवसभरात ४९८ नवीन रुग्ण आढळले. परिणामी बाधित रुग्णांची एकूण संख्या ५ लाख २३ हजार ४९७ वर गेली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here