भाजप राज्यातील जवळपास ४०० ठिकाणी आंदोलन करणार आहे. राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी हे आंदोलन राज्यभरात करण्यात येणार आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. २४ फेब्रुवारीपासून राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. नवी मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहा, असं कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना सांगितलं होतं. त्याबाबत बोलताना पाटील म्हणाले, ‘आम्ही रणनीतीमध्ये अजिबात बदल करणार नाही. हे महाविकास आघाडी सरकार अंतर्गत भांडणांमुळं कोसळणार आहे.’
इंदुरीकरांच्या वक्तव्याचं समर्थन नाहीच!
कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. इंदुरीकर महाराज अडचणीत सापडले आहेत. याबाबत वेगवेगळ्या स्तरांतून त्यांच्यावर टीका होत आहे, तर अनेकांनी त्यांना पाठिंबाही दिला आहे. या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली. ‘इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचं आपण समर्थन करणार नाही,’ असं ते म्हणाले. इंदुरीकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या किर्तनातून समाज प्रबोधनाचं काम केलं आहे, पण त्यांनी असं वक्तव्य करायला नको होतं. पण ते प्रबोधन करतात. एका वक्तव्यामुळं ते वाईट ठरत नाहीत, असंही ते म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times