नवी दिल्ली : श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी आता भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. भारतीय संघ विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या काही खेळाडूंच्या गैरहजेरीत श्रीलंकेमध्ये ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे.

श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी आता भारताचा २० सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाचे कर्णधारपद भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या हाती सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंच्या या संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.

भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.

या संघात पाच नेट्समध्ये गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर आणि सिमरनजीत सिंग यांचा समावेश करण्यात आला आहे.

सध्याच्या घडीला भारताचा एक संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. या संघात विराट कोहली,रोहित शर्मासारखे दिग्गज आणि अनुभवी खेळाडू आहे. पण श्रीलंकेच्या दौऱ्यात मात्र भारताने दुसरा संघ पाठवला असून यामध्ये युवा खेळाडूंचा भरणार जास्त आहे. पण संघात युवा खेळाडू जास्त असले तरी कर्णधारपद हे अनुभवी शिखर धवनला देण्यात आले आहे. दुसरीकडे भारताचा संघ इंग्लंडमध्ये आजपासून सराव करत आहे. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी फक्त आठ दिवसांचा कालावधी शिल्लक असून भारतीय खेळाडूंनी साऊदम्प्टन येथे सराव सुरू केला आहे. भारतीय खेळाडूंना तीन आणि चार जणांच्या गटात सराव करण्यास सुरूवात केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here