ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांपासून आपल्या करिअरची सुरुवात केलेल्या पंढरी यांना सगळे पंढरी दादा या नावाने ओळखत. चेहऱ्याचा जादूगार असलेल्या पंढरीनाथ जुकर यांना मिळालेला राज्य शासनाचा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार म्हणजे, त्यांच्या आजवरच्या अथक परिश्रमांना आणि कलेला मिळालेली दाद होती. तब्बल साठहून अधिक वर्षे पंढरीदादा या क्षेत्रात होते.
‘झनक झनक पायल बाजे’, ‘चित्रलेखा’ ‘ताजमहाल’, ‘नुर जहां’, ‘नील कमल’, ‘काला पत्थर’, ‘शोले’, ‘नागिन’, ‘मिस्टर इंडिया’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ अशा ५०० हून अधिक चित्रपटांतील कलाकारांना त्यांनी रंग दिला. या कलाकारांमध्ये मीना कुमारी, मधुबाला, नूतन, दिलीप कुमार, राज कपूर, अशोक कुमार, देव आनंद, राजेश खन्ना, सुनील दत्त, अमिताभ बच्चन, राज कुमार, शाहरुख खान, आमीर खान, करीना कपूर, विद्या बालन आणि माधुरी दिक्षीत यांचा समावेश आहे.
रंगभूषा म्हणजे केवळ चेहऱ्यावर रंग चढवणे नाही, तर त्यात पात्राचं व्यक्तिमत्त्व रंगभूषेतून उभं राहिलं पाहिजे, असं दादा आवर्जून सांगायचे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times