अमरावती : जिल्ह्यात आज मान्सून सक्रिय झाला असून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली. परंतु जमिनीत किमान सात इंच ओलावा आणि शंभर मिलिमीटर पाऊस झाल्या शिवाय पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.

आधीच बियाणे महाग आहे. त्यात दुबारा पेरणीचा खर्च शेतकऱ्यांना परवडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी 15 ते 17 जून नंतरच पाहून पाऊस पाहून पेरणी करावी आणि बियाण्याची उगवण शक्ती तपासावी असं आवाहनदेखील कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी हे घाईगडबडीने पेरणी करत आहे. अशात पाऊस अचानक निघून जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकटदेखील होते. त्यामुळे हे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी.

तसेच बियांना शेतात पेरण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता तपासण्याचा काम शेतकऱ्यांनी करावा असा सल्लाही कृषी विभागाने दिला आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील एक आठवडापर्यंत असाच पाऊस असेल. इतकंच नाहीतर पुढील 4 दिवस मुंबईसाठी रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. मुंबईव्यतिरिक्त ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेजारच्या जिल्ह्यांसाठीही रेड अलर्ट देण्यात आला आहे. आजही मुंबईत भरतीची भीती व्यक्त केली जात आहे.

आज मुसळधार पावसाची शक्यता
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, महाबळेश्वर आणि रत्नागिरीसह इतर भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य आणि उत्तरेकडील बाजूने आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्र तयार झाल्यामुळे मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. यावेळी पावसाळ्यात 18 दिवस मोठ्या भरतीची शक्यता आहे. यावेळी समुद्राच्या लाटांची उंचीही 10 मीटरपर्यंत जाऊ शकते असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here