मुंबई : कोविड उपचारांशी संबंधित खर्चामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या ग्राहकांसाठी अतिशय गरजेचा झालेला दिलासा देण्याच्या प्रयत्नांतून स्टेट बँक ऑफ इंडियाने () तारणमुक्त कर्ज योजना ‘कवच वैयक्तिक कर्ज’ जाहीर केली आहे. या कर्जाअंतर्गत स्वतःच्या तसेच कुटुंबीयांच्या कोविड उपचारांचा खर्च भागवला जाणार आहे.

एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी ‘कवच वैयक्तिक कर्ज’ या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत ग्राहकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ८.५ टक्के प्रतीवर्ष व्याजदराने ६० महिन्यांच्या कालावधीसाठी घेता येणार असून त्यामधे ३ महिन्यांच्या मोराटोरियमचा (कर्जफेड पुढे ढकलणे समावेशही आहे. हे अनोखे उत्पादन तारणमुक्त वैयक्तिक कर्ज विभागाअंतर्गत उपलब्ध करण्यात आले असून या विभागातील सर्वात कमी व्याजदरात त्याचा लाभ घेता येईल. आधीच झालेल्या कोविड उपचारांच्या खर्चाची भरपाईही या योजनेअंतर्गत दिली जाणार
आहे.

एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले, ‘कोविडग्रस्त लोकांना मदत करण्याच्या हेतूने एसबीआय कवच वैयक्तिक कर्ज योजना सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ही नवी योजना लोकांना कोणत्याही अडथळ्यांशिवाय कोविड उपचारांचा खर्च भागवण्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य पुरवणार आहे. या धोरणात्मक कर्ज योजनेसह लोकांना विशेषतः अडचणीत असलेल्या व कोविडग्रस्त झालेल्यांना आर्थिक सहाय्य मिळवून दिले जाणार आहे. ग्राहकांसाठी त्यांच्या गरजेच्या आर्थिक सेवा पुरवण्यासाठी एसबीआय सातत्याने प्रयत्न करत असते.

सध्याच्या अवघड काळात एसबीआय ग्राहकांपुढे कोविड उपचार व इतर वैयक्तिक खर्च भागवताना निर्माण झालेल्या आर्थिक संकटांत काळजी घेण्यासाठी व पर्यायाने त्यांना कोविडवर मात करण्यासाठी बांधील आहे. हे कर्ज उत्पादन आरबीआयने निर्देश दिल्याप्रमाणे बँकांनी तयार केलेल्या कोविड दिलासा उपाययोजनांचा भाग असलेल्या कोविड कर्ज पुस्तिकेचा भाग असेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here