जयंत सोनोने |
अमरावती

विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून () तिसर्‍यांदा निवडून आले आणि आता महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्य मंत्रिमंडळात ते कार्यरत आहेत. त्यांचा मतदारसंघ असलेल्या अचलपूर – परतवाडा शहरात (Achalpur Paratwada City) मागील चार दिवसांपासून नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अचलपूर परतवाडा शहरातील पाईपलाईनचे काम सुरू असल्याचे कारण देत पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता.

राज्यमंत्री बच्चू कडू समाजमाध्यमांवर नेहमीच कोणत्यातरी कारणामुळे चर्चेत असतात. मात्र यावेळी पाणी प्रश्नामुळे त्यांची चर्चा होत असून मतदारसंघातील नागरिकांकडून व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

बच्चू कडू यांच्या मतदारसंघात नेमकं काय घडतंय?
दोन दिवसात काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याची सूचना नगर पालिकेच्या वतीने देण्यात आली होती. चार दिवस उलटूनही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. अ वर्ग नगरपालिका असलेल्या अचलपूर शहरात शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष सुनीता फिसके आहेत. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधीमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचा फटका नागरिकांना बसत आहे.

मागील चार दिवसांपासून पाण्याचा एक थेंब सुद्धा शहरातील नागरिकांना मिळाला नसल्याने अनेक नागरिक स्वखर्चातून पाण्याची व्यवस्था करत आहेत. काही नगरसेवकही नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी मदत करत आहेत. कुठलीही पूर्वसूचना न देता सलग चार दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

एकाच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने सोशल डिस्टंन्सिंग संपूर्ण फज्जा उडाला आहे, जणू पाणी कपात करुन नगरपालिका प्रशासनच करोनाच्या तिसर्‍या लाटेला निमंत्रण देत आहे की काय, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता दोन दिवसाचे अवधी घेत चार दिवस पाणीपुरवठा खंडित केल्यामुळे आमदार, नगराध्यक्ष नगरसेवक व स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

दरम्यान, पेरणीच्या हंगामात शेतातली कामं सोडून अनेकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने लोकप्रतिनिधींनीविषयी रोष उफाळून आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here