बीड: न्यायालयीन आणि प्रशासकीय पातळीवर दीर्घकाळ संघर्ष केल्यानंतर लिंग बदल शस्त्रक्रिया करून ललिता साळवेचा ललितकुमार झालेला माजलगावातील तरूण अखेर विवाहबंधनात अडकला. औरंगाबाद येथे तो लग्नासाठी मुलगी बघायला गेला होता. तेथे छोटेखानी समारंभात त्यानं लग्न केलं आणि नव्या संसाराला सुरुवात केली.

माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथे ललित कुमारचा (ललिता साळवे) जन्म सर्वसामान्य कुटुंबात झाला. ललित दहा वर्षांपूर्वी महिला कर्मचारी म्हणून पोलीस दलात रूजू झाला. लहानपणापासूनच पालकांनी त्याला मुलगी म्हणून सांभाळ केला होता. पण वर्षभरापूर्वी हार्मोन्स बदलामुळं ललितला पुरुषत्वाची जाणीव होऊ लागली. शरीरात बदल जाणवू लागले. त्यानंतर लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रशासकीय आणि न्यायालयीन पातळीवर त्यानं प्रचंड संघर्ष केला. अखेर त्यात यश मिळवून त्याला शस्त्रक्रिया करण्यास परवानगी मिळाली. त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या ललित माजलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. आता त्यानं आयुष्याची दुसरी इनिंग सुरू केली आहे. औरंगाबादमध्ये लग्नासाठी मुलगी पाहायला गेलेला ललित रविवारी सीमासोबत लग्नबंधनात अडकला. औरंगाबादमध्ये छोटेखानी समारंभात त्यांना हा लग्नसोहळा पार पडला. आता त्यांच्या नव्या संसाराला सुरुवात झाली आहे. आतापर्यंतच्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले, त्यांचे त्यांनी आभार मानले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here