मुंबईः मुंबई आणि उपनगरात रविवारी आणि सोमवारी हवामान खात्यानं रेड अलर्टचा इशारा दिला आहे. मात्र, त्याआधीच मुंबईला पावसानं झोडपून काढलं आहे. आजही मुंबई व उपनगरात मुसळधार पावसाचा आंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, कोकण किनारपट्टीला देखील रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर सिंधुदुर्गमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे (Maharashtra Rain Live Updates)
Live Update
– महाड, पेणमध्ये एनडीआरएफची टीम तैनात; नागरिकांनी घराबाहेर पडू नये; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
– रायगडला मुसळधार पावसाचा इशारा; धोकादायक इमारतीतील १११ जणांचं स्थलांतर
– मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी; हवामान विभागाची माहिती
– मुंबईत २४ तासांत ७९.६६ मिमि पावसाची नोंद; हवामान विभागाची माहिती
– सिंधुदुर्गः समुद्र व नदी किनारी भागातील नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना
– सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; एनडीआरएफचं पथक दाखल
– वसई, विरार, नालासोपाऱ्यात पावसाची हजेरी; रस्त्यांवर भरले पाणी
– मुंबईत रात्रीपासून पावसाला सुरुवात; सखल भागात पाणी साचले
– ठाण्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, सखल भागात पाणी साचले
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times