सुपरकॉप अशी इमेज असलेल्या मारिया यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी एकूण पोलिस दल, कारकीर्द याबाबत काहीही भाषय केले नव्हते. मात्र ‘लेट मी से इट नाऊ’ आगामी पुस्तकात शीना बोरा प्रकरणात विस्तृत लिखाण केले आहे. एका मासिकाशी बोलताना त्यांनी अद्याप बाहेर न आलेली माहिती मांडली आहे.
मारिया यांनी बोरा प्रकरणात माजी पोलिस आयुक्त जावेद अहमद आणि आणि तेव्हाचे सहपोलिस आयुक्त देवेन भारती यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. पीटर मुखर्जी याला याबाबत त्यावेळी विचारला असता त्याने देवेन भारती यांना माहिती होती असे सांगितले. मात्र भारती यांना विचारले असता त्यांनी याबाबत नेहमीच मौन बाळगले. असे मारिया लिहितात. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या प्रकरणात काही स्तरावर संवाद साधण्यात त्रुटी राहिली असावी अशी जोड दिली आहे. काहींनी मुख्यमंत्र्यापर्यंत चुकीची माहिती पोहचवली असावी अशीही शक्यता वर्तवली. जावेद अहमद यांनी ईद निमित्त आयोजित कार्यक्रमात पीटर मुखर्जी यास आमंत्रित केले होते. त्याबाबत मंत्रालयातील अधिकाऱ्यानी का दुर्लक्ष केले असा प्रश्नही उपस्थित केला.
दरम्यान, शीना बोरा हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये गरजेपेक्षा अधिक लक्ष घातल्याने तसेच पीटर मुखर्जी याला वाचवीत असल्याचा ठपका ठेवत मारिया यांची तडकफडकी बदली करण्यात आली होती. पोलीस दलातील ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मारिया ३१ जानेवारी २०१७ रोजी निवृत्त झाले होते. निवृत्तीवेळी ते पोलीस महासंचालक (होम गार्ड) या पदावर कार्यरत होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times