अमरावती: करोना संसर्ग घटल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ‘अनलॉक’ सुरू झालं आहे. त्यामुळं रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली असून काही ठिकाणी अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. अमरावतीमधील परतवाडा-अंजनगाव मार्गावर शुक्रवारी झालेल्या एका विचित्र अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. (Car-Bike Accident On Paratwada-Anjangaon Road in )

वाचा:

परतवाडा-अंजनगाव मार्गावरील सावळी दातुराजवळच्या बुलडाणा वेअर हाऊसच्या समोर हा अपघात झाला. अंजनगांवाहून परतवाडाकडे येणारी कार (क्र. एमएच ०४ डीआर ६९९२) समोरून येणाऱ्या एका दुचाकीला (क्रं. एमएच २७ बीजी ६५५२) धडकली. हा अपघात इतका भयंकर होता की दुचाकी घसरून कारच्या खाली आली. त्यात दुचाकीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. यात दर्याबादचे अब्दुल गफ्फार शेख हुसेन,अब्दुल जलील अ. रशिद हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर, कारचा ड्रायव्हर देखील जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here