पुणे:
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता आज, १८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. राज्यभरात एकूण १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यासंदर्भातली माहिती देणारी पत्रकार परिषद बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी घेतली.

परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण १५,०५,०२७ विद्यार्थ्यांपैकी ८,४३,५५२ विद्यार्थी तर ६,६१,३२५ विद्यार्थिनी आहेत. राज्यभर एकूण ३,०३६ परीक्षा केंद्रे आहेत.

परीक्षेला बसलेले शाखानिहाय विद्यार्थी -विज्ञान – ५,८५,७३६कला – ४,७५,१३४वाणिज्य – ३,८६, ७८४व्होकेशनल – ५७,३७३एकूण – १५,०५, ०२७
—–

यावर्षीच्या परीक्षेचं वैशिष्ट्य म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा आराखडा बदललेला आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मंडळाने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. शिवाय १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विभागीय मंडळामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

हेल्पलाइन क्रमांक पुढीलप्रमाणे -विभागीय मंडळ – हेल्पलाइन क्रमांकपुणे – ७०३८७५२९७२नागपूर – (०७१२) २५६५४०३ / २५५३४०१औरंगाबाद – (०२४०) २३३४२२८ / २३३४२८४ / २३३१११६मुंबई – (०२२) २७८८१०७५ / २७८९३७५६कोल्हापूर – (०२३१) २६९६१०१ / २६९६१०२ / २६९६१०३अमरावती – (०७२१) २६६१६०८नाशिक – (०२५३) २५९२१४१ / २५९२१४३लातूर – (०२३८२) २५१७३३कोकण – (०२३५२) २२८४८०—————–

मोबाइलबंदी

परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना मोबाईल नेण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. गणित, पुस्तपालन व लेखाकर्म, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांच्या परीक्षांसाठी कॅल्क्युलेटर नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांना मोबाइलमधील किंवा अन्य कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स साधनांमधील कॅल्क्युलेटर वापरता येणार नाही, याची नोंद घ्यावी.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here