आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात यांनी करोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत नाशिकमधील करोना परिस्थितीची माहिती दिली. कोरोनाची परिस्थिती आता आटोक्यात आली असून अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठा सुधार झाला आहे. जिल्ह्याच्या पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के एवढा आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.
वाचाः
नाशिकमध्ये निर्बंध कायम असले तरीही विवाहसोहळ्यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्बंधात लॉन्स करीता शनिवार आणि रविवारीही ५० टक्के सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, विवाहसोहळ्यासाठी ५० जणांच्या उपस्थितीची अट कायम राहणार आहे. तसंच, नाशिक शहर दुसऱ्या टप्प्यात तर ग्रामीण भाग तिसऱ्या टप्प्यात आहे. पुढच्या आठवड्यात नाशिकचा तिसऱ्या टप्प्यात समावेश झाल्यास निर्बंध शिथिल होतील, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.
वाचाः
विचार करुनच वारीबाबत निर्णय
मत्रिमंडळात असलेल्यांच्या घरातील आजोबा-पणजोबांपासून सगळे वारी करतात. त्यामुळे वारीचा निर्णय विचार करूनच घेतला आहे. लग्नात सुद्धा ५० लोकांना आपण परवानगी दिली आहे. विचार करूनच निर्णय घेतला आहे. तो प्रतिष्ठेचा विषय करू नये. ज्यांना राजकारण करायचं आहे. त्यांना रोखू शकत नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times