वाचा:
खासदार संभाजीराजे आज कोपर्डीला आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. कोपर्डीच्या आरोपींना शिक्षा व्हावी, मराठा आक्षणाचा लढा कसा होणार, यासंबंधी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. मात्र, चंद्रकात पाटील यांच्यासंबंधी प्रश्न विचारताच ते चांगलेच भडकलेले दिसले. गेल्या काही दिवसांपासून पाटील संभाजीराजे यांच्या भूमिकेविषयी प्रश्न उपस्थित करीत आहेत. याशिवाय संभाजीराजे भाजपपासून दुरावल्याची चर्चाही सुरू झाली आहे.
वाचा:
या संबंधीच्या प्रश्नांना उत्तरे देताना संभाजीराजे म्हणाले, ‘मी २००७ पासून मराठा समाजाच्या लढ्यात आहे. चंद्रकांत पाटील यात केव्हा आले हे मला माहिती नाही. ते तुम्ही त्यांनाच विचारा. त्यामुळे कोणी काही शिकविण्याची गरज नाही. ते मी ऐकण्याचेही कारण नाही. हा सल्ला जर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस देत असतील तर मी ऐकू शकतो. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. काल परवापासून सर्वांनाच संभाजीराजे दिसू लागलेत. देवाचे मंत्र म्हणायचे असते, तर हे सगळे संभाजीराजेंचा जप करीत आहेत. कोणाच्या मनात काय आहे, हे त्यांनाच विचारले पाहिजे, मला कसे सांगता येईल? मी छत्रपती शिवराय आणि शाहू महाराजांचा वंशज आहे. त्यामुळे कोणत्याही आंदोलनाच्या निमित्ताने जनतेला वेठीस धरण्याचे काम मुळीच करणार नाही. हा लढा कायेदशीर आणि सनदीशीर मार्गाने सुरू राहिला पाहिजे. एककीडे तो लढा देताना अंतिम निकाल लागेपर्यंत तात्पुता दिलासा देता आला पाहिजे. सरकारच्या हातातील ज्या पाच गोष्टी आहेत, त्या आम्ही मांडल्या आहेत. त्यासाठी सर्व समाजाला वेठीस धरण्यापेक्षा लोकप्रतिनिधींनी तो सोडवावा, असा आमचा अग्रह आहे, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times