अयोध्याः राम मंदिर निर्माणासाठी ट्रस्ट स्थापन केल्यानंतर अयोध्येतील मुस्लिमांनी अनोखा प्रश्न उपस्थित करत ट्रस्टला पत्र लिहिलंय. राम मंदिर मुस्लिमांच्या कबरींवर बांधणार का?, असा प्रश्न या पत्रात केला गेलाय. बाबरी मशिदजवळची ४ ते ५ एकर जागा एकेकाळी दफनभूमी (कब्रिस्तान) होती, असा दावा मुस्लिमांनी केलाय.

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला मुस्लिमांनी पत्र लिहिलंय. बाबरी मशिदीजवळच्या परिसरात अनेक ठिकाणी दफनभूमी आहेत. मशिदीजवळच्या ४ ते ५ एकर परिसराचा उपयोग मुस्लिमांकडून दफनभूमी म्हणून केला जात होता. त्या ठिकाणी १८५५ पूर्वीच्या दंगलीमध्ये मृत्यू झालेल्या मुस्लिमांना दफन केलं जात होतं, असं या पत्रात म्हटलं आहे. ‘टाइम्स नाउ’ने हे वृत्त दिलंय.

७५ मुस्लिमांना दफन केलं गेलंय

नोंदवलेल्या तथ्यांनुसार १८५५मधील दंगलीत ७५ मुस्लिम मारले गेले होते. या मुस्लिमांना मशिदीच्या जवळपास असलेल्या दफनभूमीत दफन करण्यात आलं होतं. यानंतर त्या जमिनीचा वापर दफनभूमीसाठीच केला गेला, असं मुस्लिमांचे वकील एम.आर. शमशाद यांनी सांगितलं.

निर्णय ट्रस्टने घ्यायचाय

१८५५च्या दंगलीत मारल्या गेलेल्या मुस्लिमांच्या कबरींवर राम मंदिराचं निर्माण करणार का? असा सवाल शमशाद यांनी श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टला लिहिलेल्या पत्रात केलाय. यामुळे विचार करा. अशा जागेवर भगवान रामाचे मंदिर बांधणार का? या निर्णय ट्रस्टच्या व्यवस्थापनाला घ्यायय, असं त्यांनी म्हटलंय. भगवान रामबद्दल आम्हाला सन्मान आणि आदर आहे. पण बाबरी मशिदीजवळील ४ ते ५ एकर जमीन ही दफनभूमी आहे. ही दफनभूमी आज दिसणार नाही. कारण १९४९ नंतर संपूर्ण परिसर बदलला गेलाय ज्यावेळी बळजबरीने भगवान रामाची मूर्ती मशिदीत ठेवली गेलीय. तसंच १९९२ मध्ये मशिद पाडल्यानंतरही परिसरात आणखी बदल झालाय,असं शमशाद यांनी म्हटलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here