पवार-किशोर भेटीसंदर्भात नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली. तेव्हा ते बोलत होते. लोकशाहीमध्ये कोणीही कोणाचीही भेट घेऊ शकतो. कोणीही कोणतीही रणनीती आखू शकतो. मात्र एक लक्षात घेतले पाहिजे की आताही मोदी आहेत आणि सन २०२४ च्या निवडणुकीतही मोदीच असणार आहेत, असे फडणवीस म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान, पवार-प्रशांत किशोर भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्याबाबत उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. त्यावर फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपविरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
वारीला परवानगी द्यायला हवी होती- फडणवीस
यावेळी फडणवीस यांनी पंढरपूरसाठी निघणाऱ्या वारीला परवानगी न देण्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. जर मर्यादित वारकऱ्यांची वार निघत असेल तर अशा वारीला परवानगी मिळायला हवी होती. वारकऱ्यांनी ५० वारकऱ्यांच्या वारीला परवानगी मागितली होती. शिवाय मार्गात येणाऱ्या गावांतून कोणीही रस्त्यावर येणार नाही असे ठरावही गावकऱ्यांनी केले आहेत. एवढ्या शिस्तीत जर वारी निघत असेल तर अशा वारीला परवानगी द्यायला हवी होती, असी प्रतिक्रिया फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times