कापसे कुटुंबीयांनी संवेदनशीपणे दिलेल्या सहमतीमुळे अवयव निकामी झालेल्या तिघांच्या आयुष्यात उमेदीची प्रकाश पेरणी शक्य झाली आहे. मेंदू पेशी मृत झालेले बाबा यापुढे कुटुंबात दिसणार नाहीत, हे डोंगरा एवढे दु:ख बाजूला ठेवून त्यांचा मुलगा प्रथमेश या तरुण मुलाने अवयवदानाची तयारी दर्शविली. वडिलांच्या बाबतीत असा निर्णय घेणे कोणत्याही मुलासाठी काळजावर दगड ठेवण्यासारखे आहे. प्रथमेश यांनी हे दिव्य पेलले आणि आई सविता यांचीही समजूत काढली.
बाबा यापुढे दिसणार नसले तरी तिघांच्या शरीरात त्यांचे अस्तित्व अनुभवता येऊ शकते, हे या कुटुंबीयांना पटले आणि त्यांनी अवयवदानासाठी कायदेशीर लेखी परवानगी दिली.
क्लिक करा आणि वाचा-
वाडी येथील एका कंपनीत काम करणारे ५८ वर्षीय प्रकाश कापसे हे अयोध्या नगरात राहतात. कंपनीत ९ जून ला काम करीत असताना ते तोल जाऊ डोक्याच्या भारावर कोसळले. त्यांना कुटुंबीयांनी तातडीने लकडगंज येथील न्यू इरा रुग्णालयात दाखल केले. डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत होती. अशातच तिसऱ्या दिवशी ११ जूनला त्यांच्या मेंदूपेशी मृत पावत असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. न्यूरो सर्जन डॉ. निधेश अग्रवाल, न्यूरो फिजिशियन डॉ. पराग मून यांनी या बाबत कुटुंबियांना माहिती देऊन त्यांचे समुपदेशन केले.
क्लिक करा आणि वाचा-
ही बाब प्रकाश यांच्या पत्नी सविता आणि मुलगा प्रथमेश यांना पटली. त्यांनी कायदेशीर लेखी संमतीपत्र देताच विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीला माहिती देण्यात आली. समितीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते यांनी यादी तपासली असता न्यू इरा रुग्णालयातच एक व्यक्ती यकृत आणि दुसरा मूत्रपिंडाच्या आणि तिसरा सेव्हन स्टार रुग्णालयात मूत्रपिंडाच्या प्रतिक्षा यादीत अग्रक्रमावर असल्याचे आढळले. त्यानंतर तडक अवयव मिळविण्यासाठी रिट्रायव्हल अभियान राबविले गेले.
क्लिक करा आणि वाचा-
न्यू इराने दिले जीवनदान
लॉकडाऊनमुळे लागलेले निर्बंध शिथील झाल्यानंतर अवघ्या आठवडाभरात झालेले हे दुसरे महा ठरले आहे. तीनच दिवसांपूर्वी झालेल्या अवयवदानामुळे चार जणांच्या आणि आता आणखी तिघांच्या आयुष्यात नव्याने जगण्याच्या उमेदिचा किरण पेरता येणे शक्य झाले आहे. अवघ्या पाच दिवसांत त्यामुळे सात जणांना जीवदान मिळाले आहे. न्यू इरा रुग्णालयाच्या पुढाकारातून शनिवारी झालेल्या महा अवयवदानामुळे यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. राहूल सक्सेना, डॉ. साहिल बंसल, डॉ. स्नेहा खाडे, डॉ. अश्विनी चौधरी, डॉ. प्रकाश खेतान, डॉ. शब्बीर राजा, न्यूरॉलॉजिस्ट डॉ. निलेश भांगे, युरॉलॉजी सर्जन डॉ. सदाशिव भोळे, डॉ. मोहन नारकर, डॉ. संदिप नागमोते, इंटेसिव्हिस्ट डॉ. रमेश हसानी यांच्या नेतृत्वाखालील टीमने या मोहिमेतून उपलब्ध झालेल्या अवयवांचे तातडीने प्रतिक्षेत असलेल्यांना प्रत्यारोपण केले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times