जालना: जालन्यातील एका खाजगी बस आणि क्रुझर जीपचा अंबड टी पॉईंटवर झालेल्या भीषण अपघातात एक प्रवासी महिला जागीच ठार झाली, तर इतर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज रविवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला. स्वाती अजय काळे (३०) असे या अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. (one dead and 8 seriously injured in an accident at ambad tea point in jalna district)

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील चांदस येथील ९ प्रवासी क्रुझर जीपने रामनगर साखर कारखाना येथे लग्न सोहळ्यासाठी जात होते. त्यांच्या जीपला विदर्भातून यवतमाळ जिल्ह्यातून मुंबईकडे ३५ प्रवाश्यांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसने अंबड चौफुलीवर जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता, की जीप रस्त्याच्या कडेला तीन वेळा पलटी खात कोसळली. तसेच, खाजगी बसचा समोरच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.

खाजगी बसचे या अपघातात नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने बस मधील एकही प्रवाशी जखमी झालेला नाही. जीपमधील जखमीवर संजीवनी हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती कळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टाक यांच्यासह पोलीस कर्मचारी दीपक दाभाडे, राजू साळवे, उमेश साबळे, गजानन काकडे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी जखमींना मदत केली.

या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे:

१. धोंडीराम रामराव तांबवे (४२)

२. सागर अरविंद शेंडगे (२७)

३. आनंद उत्तम काळे (२१)

४. प्रियांका सागर शेंडगे (२२)

५. सविता धोंडीराम तांबवे (३५)

६. सार्थक अजय काळे (८)

७. राजवीर सागर शेंडगे (५)

८. राजनंदिनी सागर शेंडगे (३)

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here