सोलापूर : राज्यात करोनाच्या संसर्गाचा धोका कमी होताच लोकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. करोनाचे निर्बंध शिथील करताच नागरिकांना कोणाचा विसर्ग पडल्याचं समोर आलं आहे. कारण, सोलापूरच्या एका प्रसिद्ध डान्सबारमध्ये मोठ्या संख्येनं लोकांना प्रवेश देण्यात आल्याचं समोर आलं आहे. सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे इथं बारबालांकडून अश्लील नृत्यदेखील सुरू होतं तर काहीजण बारबालांवर नोटांची उधळण करत होते.

निर्बंधांना पायी तुडवत अशा प्रकारे बार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत बारवर छापा टाकला. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून आठ नृत्यांगनांसोबत 29 जणांना सोबत ताब्यात घेतलं आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून बार मालकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील हॉटेल पॅराडाईजमध्ये हा धक्कादायक प्रकार सुरू होता. खरंतर, सोलापूरमध्ये मनोरंजानांची ठिकाणं फक्त 50 टक्के क्षमतेनं खुली ठेवण्याची परवानगी आहे. पण तरीदेखील जास्त क्षमतेने ग्राहकांना प्रवेश देण्यात आला होता.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here