कोल्हापूर: करोनाचा कहर कायम असलेल्या आणि सात टक्के लसीकरण झालेल्या कोल्हापूरचा १६ टक्के हा पॉझिटिव्हिटी दर राज्यात सर्वाधिक आहे. शेजारच्या सांगली जिल्ह्यात करोनाचा कहर कमी होत असताना कोल्हापूरसह सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत परिस्थिती चिंताजनकच बनत चालली आहे. यामुळे उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री हे आढावा घेण्यासाठी सोमवारी ताकदीने कोल्हापुरात दाखल होत आहेत. (dy cm and health minister will take review of corona situation in kolhapur)

मुंबई, पुणे यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात करोनाचा कहर कमी होत आहे. पण कोल्हापूरचा कहर दोन महिन्यानंतरही कायम आहे. रोज दीड हजाराच्या आसपास करोना रूग्ण आढळत असल्याने आतापर्यंतचा आकडा सव्वा लाखाच्या पुढे गेला आहे. चार हजार जणांचा बळी गेला आहे. बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण चांगले असले तरी रोज सापडणाऱ्या रूग्णांची आकडेवारी चिंताजनक आहे. गेल्या काही दिवसात रोज नऊ ते दहा हजार करोना तपासण्या केल्या जातात. त्यामध्ये दीड हजारावर रूग्ण आढळत असल्याने पॉझिटिव्हिटी दर पंधरा ते सोळा टक्क्यापर्यंत जातो. हा दर राज्यात सर्वाधिक आहे. मृत्यू दर तीन टक्क्यापेक्षा अधिक आहे.

पॉझिटिव्हिटी दरात पुढे असणारा कोल्हापूर जिल्हा दुसरीकडे लसीकरणातही आघाडीवर आहे. आत्तापर्यंत पहिला डोस २८ टक्के तर दुसरा डोस १२ टक्के लोकांना देण्यात आला आहे. एकूण सरासरी सात टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. आरोग्य कर्मचारी ५९ टक्के तर फ्रंटलाईन वर्कर्सना ८५ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. ४५ वर्षावरील ६६ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
कोल्हापूर जिल्ह्यात १ मार्चला करोनाचे केवळ ३७१ रूग्ण होते, ते एक एप्रिलला ७५८, एक मे रोजी ९५०० तर एक जूनला १८५९० तसेच अकरा जूनला १२५०० अॅक्टिव्ह आहेत. रोज तीस ते चाळीस लोकांचा करोनामुळे बळी जात आहे. दीड हजारावर लोकांना त्याची बाधा होत असल्याने त्याला रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊनसह अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. पण त्याचाही फारसा उपयोग होत नसल्याने जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक बनत चालली आहे.

करोनाला लगाम घालण्यासाठी तपासणी वाढविण्यात आली आहे. पूर्वी रोज ५ ते ६ हजार तपासण्या होत होत्या, त्या आत्ता दहा हजारावर करण्यात येत आहेत. याशिवाय करोनाला रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
रस्त्यावरील गर्दी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे. दीड कोटीवर दंड वसूल केला आहे. विनाकारण रस्त्यावर येणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी दिली आहे.

सातारा फास्ट, सांगली मात्र चांगली

कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी दर १६ टक्क्यापर्यंत असताना शेजारील सांगली जिल्ह्यातील स्थिती मात्र बदलत आहे. या जिल्ह्यातील रूग्णसंख्या कमी होत असून पॉझिटिव्हिटी दर ६.७७ इतका आहे. याउलट साताऱ्याचा दरही जास्त असून तो ११.३३ क्के आहे.

क्लिक करा आणि वाचा-

लसीकरण

एकूण उदिष्ट ३४,४३,८१७
पहिला डोस ९६१०३७
दुसरा डोस २,३९,३८०
४५ वर्षावरील लसीकरण ८,२७,२९३

पहिला डोस २८ टक्के
दुसरा डोस १२ टक्के
एकूण लसीकरण ७ टक्के
मृत्यू दर ३.१
पॉझिटिव्हिटी दर १५.९५

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here