मुंबई : मुंबईतील चांदिवली भागातील आमदार दिलीप लांडे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका व्यक्तीला नाल्याच्या चिखलात जबरदस्तीने बसवत असल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाहीतर काही लोक व्यक्तिवर कचराही टाकत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्यक्ती एक कंत्राटदार आहे. ज्याला सफाईचं काम देण्यात आलं होतं. परंतु त्याने आपलं काम प्रामाणिकपणे केलं नाही. त्यामुळे धडा शिकवण्यासाठी आमदाराने असं केल्याचं सांगण्यात येत आहे.

योग्य नालेसफाई न झाल्याने कमानी परिसरात पाणी साचत होतं. नागरिक याबाबत तक्रार करत होते, असे लांडे म्हणाले. कंत्राटदाराला बोलावलं पण तो दोन तास झाले तरी आला नाही. त्यामुळे त्याला शिवसैनिकांनी शोधून नाल्याजवळ आणला आणि रस्त्यावरील कचऱ्यात व घाणेरड्या पाण्यात बसवलं. त्याच्या अंगावर शिवसैनिकांनी कचरा देखील ओतला, अशी माहिती लांडे यांनी दिली आहे.

या भागातील आमदार म्हणून परिसर स्वच्छ राहावा ही माझी जबाबदारी आहे. तसंच नालेसफाईचं काम घेतलेल्या कंत्राटदाराचीही जबाबदारी आहे. कंत्राटदार आपलं काम करत नसल्यानं त्याला धडा शिकवला असं लांडे म्हणाले.

दरम्यान, भाजपने या प्रकरणी जोरदार टीका केली आहे. पालिकेत शिवसेनेची सत्ता असताना सेनेचे आमदार, नगरसेवक काय करत आहेत याकडे बघा. लांडे यांनी महापौर आणि पालिका आयुक्तांना अशी वागणूक देण्याची हिंमत दाखवावी, असे भाजपचे पालिकेतील पक्षनेते विनोद मिश्रा यांनी ट्वीट केल आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here