मुंबई: मानखुर्दच्या उड्डाणपुलाला नाव देण्याच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेवर भारतीय जनता पक्षाने टीकास्त्र सोडले आहे. या उड्डाणपुलाला यांचे नाव देणे योग्य असल्याचे सांगत शिवसेनेने हिंदुत्व सोडले, मराठीबाणा सोडला आणि आता सर्वसामान्य मुंबईकरांचा आवाजही सोडला अशा शब्दात भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. (bjp spokesperson criticizes shiv sena)

भाजपचे मुख्य प्रवक्ते यांनी ट्विट करत शिवसेनेवर हा निशाणा साधला आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे, तसेच मराठी बाणा देखील सोडला आहे आणि आता सर्वसामान्य मुंबईकरांचा आवाजही सोडल्याची टीका उपाध्ये यांनी केली आहे. याचे कारण म्हणजे या उड्डाणपुलाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देणे योग्य आहे. अण्णाभाऊ साठे हे सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा आवाज आहे. असे असताना ख्वाज गरीब नवाज यांचे नाव पुलाला देण्याची शिवसेना खासदाराची सूचना आहे, याकडे उपाध्ये यांनी लक्ष वेधले आहे.

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथे नवा उड्डाणपूल उभार राहत असून या पुलाला सुफी संत सुल्तानुल हिंद (मोईनुद्दीन चिश्ती- अजमेर) याचे नाव द्यावे अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. हा उड्डाणपूल छेडानगर ते मानखुर्द असा होत आहे. ही मागणी तारीक उल्मा-ए-अहले सुन्नत या संस्थेने केल्याचे खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या अर्जात म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

छेडानगर ते मानखुर्द या परिसरात सुमारे ७० टक्के लोकसंख्या ही मुस्लिम धर्मियांची आहे, असे शेवाळे यांनी म्हटले आहे. या उड्डाणपुलास सुफी संत असलेले ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देऊन समस्त मुस्लिम समाजाच्या भावनांचा सन्मान करावा, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

विश्व हिंदू परिषदेला हवे अण्णाभाऊ साठेंचे नाव

उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये विश्व हिंदू परिषदेचे मागणीपत्र जोडले आहे. यात या उड्डाणपुलाला लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या परिसरात मातंग समाजाचे बांधव मोठ्या प्रमाणावर राहत असून ते लोकशाहीर अण्णाभाऊंचे अनुयायी आहेत. स्थानिकांच्या भावनांचा आदर करून या उड्डाणपुलाला अण्णाभाऊंचे नाव द्यावे अशी मागणी चेंबूर जिल्हा विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here