पाकिस्तान प्रीमिआर लीग स्पर्धेत ही धक्कादायक घटना घडली आहे. या स्पर्धेत क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून दक्षिण आफ्रिकेचा फॅफ ड्यू प्लेसिस खेळत होता. या सामन्यात फॅफ हा पेशावर झाल्मी संघाविरुद्धच्या सामन्याचत क्षेत्ररक्षण करत होता. फॅफ हा सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. यावेळी एक चेंडू तो अडवायला गेला आणि त्याने मैदानात सूर लगावला. त्यानंतर फॅफने हा चेंडू अडवला. पण त्याचवेळी मोहम्मद हसनैन हा खेळाडूही तिथेच क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी मोहम्मदचा पाय फॅफच्या डोक्यावर आदळला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर फॅफची प्रकृती ही गंभीर वाटत होती. कारण फॅफला एवढ्या जोरात हा धक्का बसला की, त्यानंतर तो उठून उभा राहू शकला नाही. त्यामुळे लगेचच डॉक्टरांना बोलण्यात आले. डॉक्टरांनी फॅफला पाहिले आणि त्याची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांना वाटले. त्यामुळे आता फॅफला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. फॅफच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात येत आहेत. या चाचण्या झाल्यावर त्याच्यावर उपचार करण्यात येणार आहे.
फॅफची पत्नी इमाराने यावेळी म्हटले आहे की, ” ही सर्व घटना माझ्यासाठी फारच धक्कादायक आहे. फॅफला आता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. मला आशा आहे की, हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर चांगले उपचार होतील.” फॅफला जेव्हा ही दुखापत झाली तेव्हा त्याला उढून उभे राहायलाही जमत नव्हते. त्यामुळे फॅफला मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. त्यामुळे आता हॉस्पिटलमध्ये त्याच्या कोणत्या चाचण्या केल्या जाताता आणि त्याच्यावर किती तातडीने उपचार केले जातात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times