मुंबई: टाटा पॉवरतर्फे पुढील वर्षापर्यंत देशभरातील ‘इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंग स्टेशन’ची संख्या वाढवून ७००वर नेण्यात येणार आहे. कंपनीने आतापर्यंत नवी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, पुणे आणि हैदराबाद येथे मिळून १०० ‘इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंग स्टेशन’ उभारली आहेत. मार्च २०२० पर्यंत या स्टेशनांची संख्या ३०० वर नेण्यात येणार आहे, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली. ‘सद्य परिस्थितीत आम्ही इलेक्ट्रिक वाहनांची संख्या अधिक असणाऱ्या ठिकाणांचा शोध घेत असून, लवकरच तेथे इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. पुढील वर्षापर्यंत साधारणत: सातशे इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंग स्टेशन उभारण्याची आमची योजना आहे,’ अशी माहिती टाटा पॉवरचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक प्रावीर सिन्हा यांनी दिली. केंद्र सरकारने विजेवरील वाहनांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणल्याने नजीकच्या भविष्यात या वाहनांच्या किंमती आवाक्यात येण्याची शक्यताही सिन्हा यांनी वर्तवली. कंपनीचा भर केवळ सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर नसून, ग्राहकांना घरपोच चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचाही आमचा प्रयत्न असल्याचे सिन्हा म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here