कोण आहे हा मराठमोळा खेळाडू…भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेमध्ये तीन ट्वेन्टी-२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी सलामीवीर शिखर धवनची भारताच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर द्रविडला मदत करण्यासाठी आता गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारताचा माजी मराठमोळा गोलंदाज पारस म्हाम्ब्रेची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर टी. दीपक हे भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील.
पारसकडे नेमका काय आहे अनुभव…राहुल द्रविडने यापूर्वी भारताच्या युवा संघाचे प्रशिक्षकपद भुषवले होते. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने युवा विश्वचषकही जिंकला होता. त्यावेळी द्रविडला मदत केली होती ती पारसने. कारण पारसने यावेळी भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका समर्थपणे पार पाडली होती. आता आयपीएलमध्ये जे काही युवा गोलंदाज दिसत आहे, त्यांना पारसमे मार्गदर्शन केले आहे. पारसकडे आतापर्यंत प्रशिक्षणाचा चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे राहुल द्रविडबरोबर पुन्हा एकदा पारस आल्यामुळे नक्कीच भारताच्या गोलंदाजीला चांगला आकार मिळू शकतो. त्यामुळे आता या दौऱ्यात भारतीय संघ नेमका कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणारा भारताचा संघ सोमवारपासून क्वारंटाइन होणार आहे. त्यानंतर २७ जूनला भारतीय संघ श्रीलंकेत दाखल होणार आहे. श्रीलकेत पोहोचल्यावर भारतीय संघाला तीन दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. त्यांनतर भारतीय संघ सराव करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघात अनुभवी खेळाडू फार कमी आहेत. त्यामुळे हे युवा खेळाडू श्रीलंकेच्या दौऱ्यात नेमकी कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्याचबरोबर द्रविड संघाला कसे मार्गदर्शन करतो, याकडेही सर्वांचे लक्ष असेल. कारण आतापर्यंत बरेच खेळाडू द्रविडने घडवलेले आहेत. त्यामुळे हा दौरा भारतीय संघासाठी नक्कीच महत्वाचा ठरणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times