वाचा:
मुंबईतील करोनाचा ग्राफ सातत्याने खाली येत आहे. मुंबईत मृतांचा आकडा मोठा होता. ते प्रमाणही गेले काही दिवस कमी झाले आहे. गेल्या २४ तासांतील आकडेवारीवर नजर मारल्यास नवीन करोना बाधित रुग्ण आणि रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेले रुग्ण यांत किंचित फरक आहे. आज ७०० नवीन बाधितांची नोंद झाली तर त्याचवेळी ७०४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. आज १९ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील ११ रुग्ण सहव्याधीग्रस्त होते. मृतांमध्ये १५ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश होता. ४० वर्षांखालील २, ४० ते ६० वयोगटातील ७ तर ६० वर्षांवरील १० रुग्ण आज दगावले. क्षेत्रात आतापर्यंत करोनाचे ७ लाख १६ हजार ५७९ रुग्ण आढळले. त्यातील ६ लाख ८३ हजार ३८२ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले तर १५ हजार १८३ रुग्णांना प्राणास मुकावे लागले. सध्या मुंबईत १५ हजार ७७३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
वाचा:
मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९५ टक्के इतके असून ६ जून ते १२ जून या कालावधीत कोविड रुग्णवाढीचा दर ०.१० टक्के इतका राहिला आहे. मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता ६५३ दिवसांवर पोहचला आहे. आज दिवसभरात ३० हजार १३७ कोविड चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ६६,२०,५०८ इतक्या चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. झोपडपट्टी विभाग आणि चाळींमधील सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या २२ पर्यंत कमी झाली आहे तर पाच पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या ८३ इमारती सध्या सील करण्यात आलेल्या आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times