वाचा:
कात्रज येथून शनिवारी ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या मुलीच्या पालकांनी या बाबत ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सोशल मीडियावर मेसेज पाठवून, मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.
वाचा:
दरम्यान, रविवारी सकाळी रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाला सदर मुलगी एका व्यक्तीसोबत आढळून आली. जवानाने संशयावरून त्या व्यक्तीला आणि मुलीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, अपहरणाचा प्रकार समोर आला. सुरक्षा दलाने पोलिसांना त्याबाबत सूचित करून आरोपी आणि मुलीला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सर्जेराव उमाजी बनसोडे असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्या चौकशीत धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. या मुलीला भीक मागायला लावण्याचा उद्देश होता. त्यासाठी तिचे अपहरण करण्यात आले होते, असे समोर आले असून या अनुषंगाने पोलीस अधिक तपास करीत आहेत.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times