मुंबईः ‘सध्याचे राजकारण हा फक्त पैशांचा खेळ झाला आहे. तत्व, विचार, राष्ट्र या संकल्पना मागे पडल्या आहेत. पैसा फेको तमाशा देखो हा नवा खेळ गेल्या काही वर्षापासून सुरु झाला आहे, अशी टीका करतानाच एका वर्षात भारतीय जनता पक्षाला ७५० कोटी रुपयांच्या भरघोस देणग्या मिळाल्या आहेत,’ असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे.

सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपला मिळालेल्या देणग्यांवरुन टीकेचे बाण सोडले आहेत. ‘२०१४ आणि २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीत पैशांचा अफाट व अचाट वापर करण्यात आला. पैशांची ने-आण करण्यासाठी विमाने व हेलिकॉप्टरचा वापर झाला. तो सर्व कारभार पाहता ७५० कोटींच्या देणग्या म्हणजे झाडावरुन गळून पडलेली सुकलेली पानेच म्हणावी लागतील,’ अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

वाचाः

‘राजकारणात पैशांचा धूर निघणे हे आता नेहमीचेच झाले आहे. सत्ता आणि पैसा ही एक वेगळी नशा आहे. पैशांतून सत्ता, सत्तेतून पुन्हा पैसा. त्याच पैशांतून पुनः पुन्हा सत्ता. हे दुष्टचक्र भेदणे आपल्या लोकशाहीत आता कुणालाही शक्य होईल असे वाटत नाही. उद्योगपती, बिल्डर्स, ठेकेदार, व्यापारी मंडळी कोटय़वधीच्या देणग्या एखाद्या राजकीय पक्षास देतात ते काय फक्त धर्मादाय म्हणून? या देणग्यांची वसुली पुढच्या काळात व्यवस्थित होतच असते,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचाः

‘पैसा हाच राजकारणाचा आत्मा बनला आहे. देशाच्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीची ही शोकांतिका आहे हे मान्य, पण हा पैशांचा खेळ यशस्वी होतो असेही नाही. श्रीमंत भारतीय जनता पक्षाला प. बंगालची निवडणूक जिंकता आली नाही व आठ कोटी रुपये देणगीदाखल मिळालेल्या तृणमूल काँग्रेसने ७५० कोटीवाल्या भाजपचा सहज पराभव केला. महाराष्ट्रातील शिवसेनेचे नाव श्रीमंतांच्या यादीत नाही व मोठ्या देणग्या शिवसेनेस मिळाल्याचे दिसत नाही, तरीही लोकांचा पाठिंबा या एकमेव श्रीमंतीवर शिवसेना गेल्या पन्नास वर्षांपासून मैदानात लढतेच आहे. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही अनेकांचा पराभव होतो तर अनेक ‘फाटके’ उमेदवार पैशांचा गाजावाजा न करता श्रीमंतीचा पराभव करून विजयी झालेच आहेत,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचाः

भाजपला ७५० कोटींची देणगी देणारे कोण?

‘भाजपला २०१९-२० मध्ये जे भव्य देणगीदार लाभले आहेत ते कोण आहेत? त्यात अंबानी, अदानी, मित्तल, टाटा, बिर्ला ही हमखास नावे नाहीत. सगळ्यात मोठे दानशूर फुडेंट इलेक्टोरल ट्रस्ट असून त्यांनी २१७.७५ कोटी रुपये भाजपला दान दिले आहेत. आयटीसी ग्रुपने ७६ कोटी, जनकल्याण ट्रस्टने ४५.९५ कोटी, शिवाय महाराष्ट्रातील बी.जी. शिर्के कन्स्ट्रक्शनचे ३५ कोटी, लोढा डेव्हलपर्सचे २१ कोटी, गुलमण डेव्हलपर्सचे २० कोटी, जुपिटर कॅपिटलचे १५ कोटी असे मोठे आकडे आहेत. देशातील १४ शिक्षण संस्थांनी भाजपच्या दानपेटीत कोटय़वधी रुपये टाकले आहेत.’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here