मुंबई: अभिनेता याच्या मृत्यूला वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं या प्रकरणाची नव्यानं चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील राजकारण ढवळून काढणारं हे प्रकरण सीबीआयनं हाती घेतल्यानंतर सुरुवातीला सनसनाटी निर्माण झाली होती. मात्र, अद्याप कुठल्याही निष्कर्षापर्यंत आलेली नाही. यावरून काँग्रेसनं शंका उपस्थित केली आहे. (Congress Questions CBI over Sushant Singh Rajput Death)

वाचा:

‘सुशांतसिंह राजपूत याच्या दुर्दैवी मृत्यूला आज एक वर्ष होत आहे. सीबीआयनं या प्रकरणाची चौकशी हातात घेऊन ३१० दिवस उलटले आहेत. ‘एम्स’च्या पॅनेलने हत्येचा मुद्दा निकाली काढून २५० दिवस झाले आहेत. असं असताना सुशांतच्या मृत्यूबाबत अंतिम निष्कर्ष सीबीआय केव्हा सांगणार आहे? सीबीआयनं सत्य लपवून का ठेवलं आहे?,’ असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते यांनी केला आहे. ‘सुशांत प्रकरणात सीबीआयवर प्रचंड दबाव आहे,’ असा स्पष्ट आरोपही त्यांनी केला आहे.

अँटिलिया प्रकरणातील मास्टरमाइंड कुठे आहे?

अँटिलिया समोर स्फोटके ठेवण्याचा कट रचणारे सचिन वाझे याच्यासह सर्व पोलीस अधिकारी तत्कालीन पोलीस आयुक्त कार्यालयातील होते तर मग राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) मास्टरमाइंडला का पकडू शकत नाही? काही गुप्त करार झाला आहे का? परमबीर सिंग यांची चौकशी का होत नाही? एनआयएनं न्यायालयाकडं जास्त वेळ मागितला आणि अद्याप काहीच का केले नाही?,’ असा सवालही सावंत यांनी केला आहे.

‘जनतेचं लक्ष दुसरीकडं वळविण्यासाठी अँटेलिया प्रकरणातील परिस्थितीजन्य पुराव्यांपेक्षा परमबीर यांच्या निराधार आरोपांना जास्त महत्त्व दिलं जात आहे. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी मोदी सरकार एनआयए, ईडी व सीबीआयचा वापर राजकीय शस्त्र म्हणून करत आहे. परंतु अखेर सत्याचा विजय होतो हे लक्षात ठेवा,’ असा इशाराही सावंत यांनी दिला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here