अंबड चौफुलीकडून मंठा चौफुलीकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावर रोडलगत एक ट्रक उभा होता. या ट्रकवर पहाटे पाच वाजेच्या सुमारास पाठीमागून एक आयशर वाहनानं जोरदार धडक दिली. त्यापाठोपाठ पाठीमागे असलेली भरधाव कार देखील जोरदार धडकली. हा अपघात इतका भीषण होता की तीनही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर, कार मधील एक प्रवासी जागीच ठार झाला आहे. तसेच अन्य काहीजण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
रस्त्याच्या बाजूला उभ्या ट्रक (क्रमांक एमएच १५ सीके १५५५) ला आयशर ट्रकने पाठीमागून धडक दिली. तर आयशरला मागच्या कार जोरात धडकली. यात कार मधील एक व्यक्ती जागेवर ठार तर तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जालना शहरालगत अंबड ते मंठा वळण रस्त्यावर सोमवारी पहाटे पाचच्या दरम्यान हा अपघात झाला.
नाशिकहून नांदेडला जाणाऱ्या ट्रकचे टायर रात्री दिड वाजेच्या सुमारास फुटल्यानंतर संबधित ट्रक ड्रायव्हरने ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा करून तो टायर बदलत होता तेवढ्यात याच मार्गाने जाणाऱ्या आयशर ट्रकने या उभ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली यात आयशरचा ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला. याच अवस्थेत उभ्या आयशर ट्रकला नाशिकहून सिंदखेडराजाला जात असलेल्या कार ( क्रमांक एमएच १५जीव्ही १४०४) ने पाठीमागून भरधाव वेगात धडक दिली. यात किरण संजय धोंगडे( वय २५, रा. खैरखेडा, ता.सिंदखेडराजा जि बुलडाणा) हे जागेवर ठार झाले तर अर्थव हा तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. कार मधील पाच प्रवासी किरकोळ जखमी आहेत.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times