वाचा:
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांनी या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपला बिहार निवडणूक लढवायची होती. म्हणूनच सीबीआयला पुढं करून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं कटकारस्थान रचण्यात आलं होतं, असा थेट आरोप मलिक यांनी केला आहे.
वाचा:
‘सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असतानाच राजकीय कारणामुळं या प्रकरणाचा गुन्हा बिहार सरकारनं दाखल केला व ही केस सीबीआयकडे दिली होती. परंतु, निष्पन्न काय झालं? एक वर्ष उलटूनही सुशांतसिंहच्या आत्महत्येचा तपास पूर्ण झालेला नाही. सुशांतनं आत्महत्या केली नव्हती असं म्हटलं जात असेल तर मग त्याचा खुनी कोण हे सीबीआयनं जनतेला सांगितलं पाहिजे,’ अशी मागणी मलिक यांनी केली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times