‘काँग्रेसनं निवडणूक कशी लढायची हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील त्यांच्या नेत्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे. आम्हीही जिल्ह्यातील स्थानिक निवडणुका स्वबळावर लढायची तयारी सुरू केली आहे. येथील प्रत्येक निवडणुकीनंतर भगवा फडकलेला दिसेल,’ असा दावा सत्तार यांनी व्यक्त केला.
वाचा:
‘मुख्यमंत्रिपदाविषयी म्हणाल तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पुढची पाच वर्षे उद्धवजी ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यानंतर ज्याला कोणाला मुख्यमंत्रिपद हवं असेल त्या पक्षाला सर्वाधिक जागा निवडून आणाव्या लागतील. काँग्रेसच्या जास्त जागा निवडून आल्या तर त्यांनाही निश्चित संधी मिळेल,’ असं सत्तार म्हणाले. ‘सध्या महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमानुसार पुढची साडेतीन वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यानंतरही शिवसेनाच हाच महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष असेल आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
वाचा:
शिवसेनेचा वर्धापन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जालना येथे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना कपाशी बियाणे व प्रत्येक सात हजार रुपयांची रोख रक्कम मदत म्हणून देण्यात आली. राज्यमंत्री सत्तार यांच्या हस्ते मदतीचं वाटप करण्यात आलं. यावेळी जालना जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना नेते लक्ष्मण वडले, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
As I am looking at your writing, baccaratsite I regret being unable to do outdoor activities due to Corona 19, and I miss my old daily life. If you also miss the daily life of those days, would you please visit my site once? My site is a site where I post about photos and daily life when I was free.