खासदार संभाजीराजे आणि यांची आज पुण्यातील औंध परिसरात सुमारे तासाभर चर्चा झाली. त्यानंतर दोघांनाही पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या मागण्यांचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीचाही उल्लेख केला.
क्लिक करा आणि वाचा-
आमच्या मागण्या लवकरात लवकर मार्गी लावा- संभाजीराजे
पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे यांनी आपल्या मागण्यांचा पुनरुच्चार केला. सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, ओबीसींच्या सवलती मराठा समाजातील गरिबांना मिळणे, जिल्ह्यात वसतीगृह निर्माण करणे, २ हजार १८५ विद्यार्थ्यांच्या प्रलंबित नियुक्त्या तत्काळ देणे अशा मागण्या आम्ही सरकारपुढे ठेवल्या असल्याचे संभाजीराजे म्हणाले. या मागण्या सरकारने तत्काळ मान्य कराव्यात असेही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिलेल्या सूचनांनुसार राज्य सरकार सुपर न्यूमररीचा वापर करण्यास मोकळे असून ती पद्धत शिक्षणात वापरण्यात यावी अशी आमची मागणी असल्याचेही ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
‘दोन घराण्यांच्या भेटीचा आनंदच आहे’
सातारा आणि कोल्हापूर या दोन घराण्यांची एकत्र भेट झाली असून त्याचा आपल्याला आनंदच असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे. या वेळी त्यांनी शाहू महाराज आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीबाबत आपल्याला काही कल्पना नसल्याचे ते म्हणाले. अजित पवार हे शाहू महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले असावेत, मात्र जर त्याच्या भेटीतून काही निघणार असेल तर मला आनंदच आहे, असेही संभाजीराजे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times