गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढविणार असल्याचं वारंवार सांगत आहेत. यावर आता काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली. जेव्हा प्रदेशाध्यक्षांनी स्वबळाची भूमिका मांडली आहे तर तो पक्षाचा निर्णय म्हणून आम्हाला मान्यच करावा लागेल, असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.
नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर काय म्हणाले अशोक चव्हाण?
नाना पटोले यांनी नुकतंच एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे महाविकास आघाडीत आगामी काळात मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धा रंगणार का, अशी चर्चा सुरू झाली. या मुद्यावर अशोक चव्हाण यांनी प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं. त्यामुळे पटोलेंनी बोलून दाखवलेल्या इच्छेत गैर काही नसल्याचं म्हटलं आहे.
पेट्रोल दरवाढीवर चव्हाणांची प्रतिक्रिया
‘पेट्रोल डिझल दरवाढीवर आम्ही विविध पक्षासहित देशव्यापी आंदोलन केलं. केंद्रातील सरकारला जनतेच्या असंतोषाची जाणीव असली पाहिजे. सामान्य माणसांना ही दरवाढ न परवडणारी आहे. सरकारचे कर जास्त असल्याने इंधनाचे शंभरीच्याहून अधिक पैसे मोजावे लागत असल्याने सामान्य माणसांच्या बजेटला झळ पोहोचली आहे,’ असं म्हणत अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times