नागपूर: प्रादुर्भावाच्या दोन लाटांची झळ बसलेल्या जिल्ह्यातील चेन भेदली गेली आहे. नव्याने आजाराचा विळखा पडलेल्यांच्या संख्येत झपाट्याने होणारी घट आणि त्याच वेगाने आजाराच्या मुक्तीचा दरही वाढत आहे. सोमवारी दिवसभरात करोनाचे संक्रमण झाल्याच्या शक्यतेतून ६ हजार ९२९ जणांच्या घशातील स्राव नमुने तपासले गेले. त्यातील ३० जणांच्या घशात विषाणूचा अंश सापडला तर दुसरीकडे १९३ बाधितांनी आजारावर मात केली. या सोबतच आता जिल्ह्यातील अॅक्टिव्ह करोना बाधित रुग्णसंख्याही २ हजारांच्या खाली येऊन १ हजार ७७० इतकी नोंदविली गेली आहे. ( )

वाचा:

नागपूर जिल्ह्याला दिलासा देणारी आणखी एक बाब म्हणजे करोनाची बाधा होऊन उपचारादरम्यान दगावलेल्या ३ जणांपैकी केवळ एक रुग्ण नागपूर शहरातील होता तर अन्य दोघे जण बाहेरच्या जिल्ह्यातून नागपुरात उपचारासाठी रेफर करण्यात आलेल्यांपैकी होते. ग्रामीण भागातून आजही शून्य मृत्यू अशी नोंद घेतली गेली. बाधा झाल्याच्या संशयातून तपासल्या गेलेल्या एकूण नमुन्यांपैकी ६ हजार ८९९ जणांच्या घशातील स्राव नमुन्यांत कुठल्याही प्रकारचा अंश सापडला नाही. त्यामुळे संपर्कात आल्याने होणारी संसर्ग साखळी भेदून निघाल्याचे सांगितले जात आहे. या विषाणूने जिल्ह्यात शिरकाव केल्यापासून आजवर ४ लाख ७६ हजार ४४५ जणांना आजाराचे निदान करण्यात आले आहे. त्यापैकी ४ लाख ६५ हजार ६६८ जणांनी आजारावर मात केलेली आहे. आजारमुक्तीची ही सरासरी सोमवारीही ९८ टक्क्यांवर कायम होती.

वाचा:

ग्रामीणमध्ये एकही मृत्यू नाही

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका शहरासोबतच ग्रामीण भागांनाही बसला होता. जिल्ह्यातील काही तालुके करोनाचे हॉटस्पॉट झाले होते. दुसरी लाट जोरावर असताना ग्रामीण भागातील कोविड बळींची संख्या शहराच्या बरोबरीने आली होती. सुदैवाने आता कोविडची साखळी भेदली जात असताना ग्रामीण भागातील मृत्यू दरही आटोक्यात आला आहे. आज दिवसभरात ग्रामीण भागातून जेमतेम १० नव्या रुग्णांची नोंद घेतली गेली तर एकाही कोविड बाधिताचा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मृत्यू नोंदविला गेला नाही.

नागपूरची आजची स्थिती

नवे बाधित- ३०

एकूण चाचण्या- ६९२९

मृत्यू- ३

अॅक्टिव्ह रुग्ण- १७७०

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here