या वेळी खासदार अरविंद सावंत यांनी विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीवर देखील भाष्य केले. राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत राज्यघटनेनुसार निर्णय घेतला पाहिजे. मात्र यात केवळ राजकारण करण्याचे कामच सध्या सुरू आहे. यामुळे राज्यघटनेची पायमल्ली होत आहे, असा आरोप खासदार सावंत यांनी केला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
‘राम मंदिर जमीन घोटाळ्याची चौकशी करा’
खासदार अरविंद सावंत यांनी राम मंदिर जमीन घोटाळ्यावर देखील भाष्य केले आहे. अयोध्येतील राम मंदिराबाबत आमच्या भावना स्पष्ट आहेत. धार्मिक भावनांशी खेळू नका, असे सांगत राम मंदिर जमीन घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खासदार सावंत यांनी केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
‘मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचे पुनर्वसन म्हाडाने करावे’
मुंबईतील मोडकळीस आलेल्या चाळींबाबत राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. मात्र असे असतानाही गेल्या सहा महिन्यांपासून या कायद्याला मंजुरी मिळत नाही. म्हणूनच पंतप्रधानांना या संदर्भात पत्र लिहिले आहे, असे सावंत म्हणाले. राज्य सरकारच्या कायद्याप्रमाणे जर मोडकळीस आलेल्या इमारतींचे पुनर्वसन होऊ शकत नसेल, तर म्हाडाने हे पुनर्वसन करावे, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times