या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीची पाहणी केली. या इमारतीत एका घराच्या सिलिंगचा काही भाग कोसळल्यानंतर ती शक्यता इतरही घरांमध्ये नाही ना याची पाहणी अग्निशमन दलाच्या जवानांनी केली.
क्लिक करा आणि वाचा-
नवी मुंबईतही स्लॅब कोसळला
नवी मुंबईतील नेरूळ भागातही एका घरातील सिलिंगचा काही भाग कोसळून एक व्यक्ती जखमी झाली. ही घटना शनिवारी रात्री घडली. घरातील सर्वजण झोपेत असताना हा भाग कोसळला. विश्राम लोंढे असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना घडली तेव्हा लोंढे यांची पत्नी आणि मुलगा किचनमध्ये गेले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सिडकोच्या निकृष्ट बांधकामामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. सिडको आणि पालिकेने या भागात पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्या अन्यथा अशाच एखाद्या घटनेत एखाद्याला जीव गमवावा लागल्यास त्याची जबाबदारी यंत्रणेची राहील, असे भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
मालाडमध्येही घडली होती दुर्घटना
मुंबईतील मालाड पश्चिम येथील मालवणी भागात दोनच दिवसांपूर्वी इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला होता. यात ७ जण गंभीर जखमी झाले होते. येथे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times