अहमदनगर: पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे सोमवारी रात्री सविता सुनील गायकवाड (वय ३५) या महिलेवर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने या हल्ल्यात सदर महिला ठार झाली आहे. वैयक्तिक वादातून ही घटना घडल्याचं सांगण्यात येतं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास सुरू आहे.

पारनेर तालुक्यातील पारनेर-अळकुटी मार्गावर वडझिरे गावात सोमवारी रात्री दहाच्या वाजण्याच्या सुमारे ही घटना घडली. या दोन युवकांचे सविता गायकवाड यांच्याबरोबर वाद झाले होते. यावेळी संतप्त झालेल्या एका तरुणाने स्वतःकडील गावठी पिस्तुल काढून सविता गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या तरुणाने सविता यांच्यावर एका पाठोपाठ तीन गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्या रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळल्या. महिलेच्या मुलीने आरडाओरड केल्यानंतर गावकरी जमा झाले आणि त्यांनी सविता यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र, सविता यांचा रुग्णालयात पोहोचण्याआधीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर दोन्ही आरोपी पळून गेले आहेत. गोळीबाराचं नेमकं कारण समजलं नसलं तरी वैयक्तिक वादातून ही हत्या करण्यात आली असावी असा संशय पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे.

या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला असून गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या महिलेच्या मुलीने एका तरुणाविरुध्द पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. हे सुद्धा या हत्येमागचं कारण असावं असं सांगण्यात येतं. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here