नताशाने रविवारी आपल्या इंस्टाग्रावर एक फोटो शेअर केला आहे. यामध्य हार्दिक आपल्या कुटुंबियांबरोबर चार्टर्ड विमानातून बाहेर आल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चार्टर्ड विमानात हार्दिक आपल्या कुटुंबियांबरोबर मजा करत असल्याचा फोटोही आता चांगला व्हायरल झाला आहे.
नताशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये हार्दिक, नताशा आणि त्यांचा मुलगा अगस्त्या आहे. त्याचबरोबर चार्टर्ड विमानामध्ये हार्दिकबरोबर त्याचा भाऊ कृणाल आणि त्याचे अन्य कुटुंबिय दिसत आहेत. सध्याच्या घडीला करोनामुळे लोकं बेजार झालेली असताना हार्दिक मात्र चार्टर्ड विमानातून सुट्टीचा आनंद लुटत आहे.
हार्दिकची भारतीय संघातही निवड झाली असून तो श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यात भारतीय संघत तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. या संघाचे नेतृत्व सलामीवीर शिखर धवनकडे सोपवण्यात आले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times